पुष्पांजली को-ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड
आपल्या पुष्पांजली को-ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेडची पंचवार्षिक निवडणूक २०२५-२६ ते २०३०-३१. हुकूमशाही संपवून संस्थेला खऱ्या सदस्यांच्या मालकीच्या, पारदर्शक आणि विकासाभिमुख मार्गाकडे नेहण्यासाठी येत्या रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत होत आहे. व या निवडणुकीला आम्ही संत ज्ञानेश्वर माऊली पुष्पांजली संस्थापक पॅनलच्या माध्यमातुन विमान ही निशाणी घेऊन उभे आहे. तरी संत ज्ञानेश्वर माऊली पुष्पांजली संस्थापक पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.
तुमचा मतदार यादी क्रमांक आणि मतदान केंद्र तपासण्यासाठी. e-voter slip ला क्लिक करा
e-voter slip     संत ज्ञानेश्वर माऊली पुष्पांजली संस्थापक पॅनल माहितीपत्रक
आवाहन
आपल्या सहकाराचा अभिमान - आपल्या हक्कासाठीची लढाई!
१९८८ मध्ये द्रष्ट्या संस्थापकांच्या जिद्दीने आणि सभासदांच्या विश्वासाने रुजलेली पुष्पांजली को-ऑप. क्रेडीट सोसायटी
आज ३७ वर्षांचा प्रवास पूर्ण करून १९० कोटींच्या टर्नओव्हरसह सहकाराच्या बळावर उभी आहे.
हा प्रवास केवळ आर्थिक व्यवहारांचा नव्हता - तर एकमेकांच्या सुख-दुःखात उभे राहण्याचा, सभासदांच्या स्वाभिमानाचा आणि समाजाशी असलेल्या बांधिलकीचा होता.
परंतु अलीकडील काही काळात संस्थेच्या लोकशाही मूल्यांवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. याच पार्श्वभूमीवर,
संत ज्ञानेश्वर माऊली पुष्पांजली संस्थापक पॅनल एकत्र आले आहे "हुकूमशाही हटवा, पुष्पांजली वाचवा!" या उदात्त ध्येयाने.
तुमचा मतदार यादी क्रमांक आणि मतदान केंद्र तपासण्यासाठी. e-voter slip ला क्लिक करा
e-voter slip     संत ज्ञानेश्वर माऊली पुष्पांजली संस्थापक पॅनल माहितीपत्रक
जाहिरनामा
संत ज्ञानेश्वर माऊली पुष्पांजली संस्थापक पॅनलचे पुष्पांजली को-ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड संचालक मंडळ २०२५-२६ ते २०३०-३१ चा जाहीरनामा
- लोकशाही पद्धतीचा कारभार: संस्थेतील कारभार हा कोणत्याही एका व्यक्तीच्या मर्जीवर नव्हे, तर संचालक मंडळाच्या सामूहिक निर्णयांवर आधारित असेल. प्रत्येक महत्वाचा निर्णय हा मंडळाच्या बैठकीत चर्चा करून, पारदर्शकपणे आणि नोंदीसह घेण्यात येईल. सभासदांना त्यांच्या संस्थेतील घडामोडींची, उत्पन्न-खर्चाची व गुंतवणुकीची संपूर्ण माहिती वेळोवेळी मिळेल.
- शाखा विस्तार व सेवा वाढविणे: आमचा उद्देश पुढील पाच वर्षांत दरवर्षी दोन नवीन शाखा सुरू करण्याचा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त सभासदांना त्यांच्या घराजवळच बँकिंग सुविधा मिळतील. प्रत्येक शाखेत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा - जसे की मोबाईल बँकिंग, ऑनलाइन ठेवी, कर्ज अर्ज व तत्काळ व्यवहार सुरू केल्या जातील.
- जास्त व नियमित लाभांश: सभासदांना संस्थेच्या नफ्यातून योग्य लाभ मिळावा हा आमचा पहिला उद्देश आहे. मागील काळात १२% लाभांश देण्याचा विक्रम आम्ही केला आहे. आगामी काळात हा लाभांश १२% ते १५% दरवर्षी देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- सभासद कल्याण योजना: आजार, अपघात किंवा मृत्यू अशा प्रसंगी सभासद व त्यांच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत दिली जाईल. कन्यादान योजनेतून मुलींच्या विवाहासाठी मदत, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, आणि गरजूंना मरणोत्तर सहाय्य उपलब्ध राहील.
तुमचा मतदार यादी क्रमांक आणि मतदान केंद्र तपासण्यासाठी. e-voter slip ला क्लिक करा
e-voter slip     संत ज्ञानेश्वर माऊली पुष्पांजली संस्थापक पॅनल माहितीपत्रकमतदार
उमेदवार
बूथ
शाखा
